अहमदनगर जिल्ह्याची शेती

शेती
क्र. तपशील क्षेत्र (हेक्टर)
१ निव्वळ लागवडी -खालील क्षेत्र १११५३००
२ जिरायत क्षेत्र ८१००००
३ बागायत क्षेत्र ३०५३००

जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्र व हंगामानुसार पिकांचा तपशील पुढे दिलेला आहे.
क्र. हंगाम प्रमुख पिके
१ खरीप बाजरी, भुईमूग व तूर
२ रब्बी गहू, करडई व हरभरा
३ खरीप व रब्बी ज्वारी व ऊस
ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे. अलीकडच्या काळात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन जिल्ह्यात वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुलेही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरी येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले (१९६८) कृषी विद्यापीठ होय. या ठिकाणी कृषिविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात, तसेच अनेक पिकांबाबतचे संशोधन केले जाते. स्थापनेनंतर राहुरी विद्यापीठाचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकर्यांसमध्ये लोकप्रिय आहेत. साखर कारखाना संख्येचा विचार करता राज्यात पहिल्या क्रमांकावर असणार्या नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सूची पुढे दिली आहे.
क्र. साखर कारखान्याचे नाव तालुका
१ अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले
२ संगमनेर सहकारी साखर कारखाना संगमनेर
३ कोपरगाव सहकारी साखर कारखाना कोपरगाव
४ संजीवनी सहकारी साखर कारखाना कोपरगाव
५ डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर,श्रीरामपूर
६ अशोक सहकारी साखर कारखाना श्रीरामपूर
७ बेलापूर शुगर सहकारी साखर कारखाना श्रीरामपूर
८ ज्ञानेश्र्वर सहकारी साखर कारखाना नेवासे
९ मुळा सहकारी साखर कारखाना नेवासे
१० केदारेश्र्वर सहकारी साखर कारखाना शेवगाव
११ वृद्धेश्र्वर सहकारी साखर कारखाना पाथर्डी
१२ नगर सहकारी साखर कारखाना नगर
१३ तनपुरे सहकारी साखर कारखाना राहुरी
१४ पारनेर तालुका सहकारी साखर कारखाना पारनेर
१५ श्रीगोंदे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदे
१६ कुकडी सहकारी साखर कारखाना श्रीगोंदे
१७ साईकृपा सहकारी साखर कारखाना श्रीगोंदे
१८ जगदंबा सहकारी साखर कारखाना कर्जत
देशातील पहिला सहकारी साखर कारखाना श्रीरामपूर तालुक्यात लोणी (प्रवरानगर) येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी जून,१९५० मध्ये सुरू केला.


  • मागे जाण्यासाठी येथे क्लिक करा
  •  
    Copyright © 2012. All Rights Reserved