अहमदनगर जिल्ह्यातील दळणवळण

दळणवळण

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून पुणे-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्गही पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो. पुणे-औरंगाबाद हा जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून अहमदनगरला ‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहमदनगर-पुणे या मार्गावर. अहमदनगर हे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी. चा रेल्वे (ब्रोडगेज) मार्ग जिल्ह्यात असून नगर-बीड-परळी आणि पुणतांबे-शिर्डी रेल्वे मार्गाचे काम आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना लागणारा विटा घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट - हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
अहमदनगरचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर
...पासून अंतर(कि.मी.)
मुंबई २५७
नागपूर ६०६
औरंगाबाद ११८
रत्नागिरी ४४३
पुणे १२०
संद़र्भ- महाराष्ट्र मार्गदर्शक नकाशा
समर्थ उद्योग, औरंगाबाद.




  • मागे जाण्यासाठी येथे क्लिक करा
  •  
    Copyright © 2012. All Rights Reserved