अहमदनगर जिल्ह्यातील उद्योग

उद्योग

अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर, श्रीरामपूर, पारनेर, राहुरी, जामखेड व संगमनेर या ठिकाणी महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती आहे. कायनेटिक इंजिनिअरिंग (सुपा, पारनेर), लार्सन अँड टुर्बो (अहमदनगर), व्हिडिओकॉन, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स अँड बेअरिंग्ज (अहमदनगर), पारस उद्योग (कृषी अवजारे), इंडियन सीमलेस, सी.जी.न्यू एज- कमिन्स इंडिया असे प्रमुख उद्योग नगर जिल्ह्यात आहेत. धूत ग्रूपच्या सिमेंट पिशव्या (बॅग्ज) पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. कायनेटिकचे फिरोदिया व व्हिडिओकॉनचे धूत हे उद्योजक मूळचे नगरचेच. दीपक आर्ट्स या वैशिष्ट्यपूर्ण उद्योगात सुमारे ५०० कलावंत-कर्मचारी असून, येथे बनलेल्या भेटवस्तू संपूर्ण भारतात पाठवल्या जातात. यांच्या गणेश मूर्तीही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

संगीत क्षेत्रातील साथीची वाद्ये उत्पादित करण्यामध्ये अहमदनगर राज्यात आघाडीवर आहे. प्रामुख्याने चर्मवाद्ये, हार्मोनियम, टाळ-झांज यांची निर्मिती नगरमध्ये केली जाते. वारकरी संप्रदायाच्या भजनात अत्यावश्यक असलेले कासे-पितळ्याचे टाळ फक्त नगरमध्येच तयार होतात. नगरचा कापडबाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे लग्नसराईच्या काळात बस्ता बांधण्यासाठी (कापड खरेदीसाठी) राज्याच्या अनेक भागांतील लोक अहमदनगरमध्ये येतात.

सहकार : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सुमारे ४३५ शाखा असलेली बँक राज्यातील सर्वांत मोठी बँक मानली जाते. डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी १९२३ मध्ये लोणी येथे ‘लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी’ स्थापून केली ही केवळ राज्यातीलच नव्हे तर भारतातील पहिली सहकारी पतपेढी मानली जाते.



  • मागे जाण्यासाठी येथे क्लिक करा
  •  
    Copyright © 2012. All Rights Reserved