अहमदनगर जिल्ह्यामधील विषेश

विशेष :-

महाराष्ट्रातील क्षेत्रफलाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. अहमदनगर जिल्हा हा एकेकाळी निजामशाहीची राजधानी होतो. यामुळे अहमदनगर येथील चांदबिबीचा महाल प्रसिद्ध आहे. १९४२ च्या ' चले जाव ' आंदोलनात पं.नेहरू,वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, मौलाना आझाद व इतर महत्वाचे राष्ट्रीय नेते नगरच्या किल्ल्यात बंदिवासात होते. पंडित नेहरूनी येथेच ' डिस्कव्हरी ऑफ इंडिया ' हा प्रसिध्द ग्रंथ येथेच लिहिला. पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील यांनी स्थापन केलेला प्रवरा नगर येथील देशातील पहिला सहकारी साखर कारखाना काढण्याचा आणि तो यशस्वीरीत्या चालविण्याचा मान आपल्या अहमदनगर जिल्ह्याला मिळाला.

महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वतशिखर ' कळसुबाई ' हे अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सिमेवर आहे. अहमदनगर जिल्याच्या सीमा सर्वाधिक म्हनजे ऐकूण सात जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. त्याचबरोबर राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे व पूलतांबे येथे संत चांगदेव महाराज यांची समाधी आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. अह्मदनगरपासून ५६ कि. मी. अंतरावर प्रवरा नदीच्या काठी वसलेल्या नेवासे गावात संत ज्ञानेश्वरांनी ग्रंथराज ' ज्ञानेश्वर ' सांगितली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव अहमदनगरपासून ६० कि.मी. आहे. ग्रामविकासाचे उत्तम उदाहरण म्हणून हे छोटेसे गाव सद्ध्या देशभर गाजत आहे. अहमदनगर जिल्यातील प्रवरेकाठी वसलेले दायमाबाद हे स्थळ प्राचीन व ताम्रपाषाण अवशेशानसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक 'सिद्धीवानायक' हे अहमदनगर जिल्यात सिद्धीटेक येथे आहे. शिर्डी व साईबाबा मंदिर, शनिदेवाचे मंदिर, शनी शिंगणापूर हि धार्मिक स्थळे याच जिल्ह्यात आहेत. अकोल्यामध्ये प्रवरा नदीकाठी अगस्ती ऋषींचा आश्रम आहे.

अहमदनगर मधील कर्जत तालुक्यामध्ये रेह्कुरी हे काळवीटानसाठीचे अभयारण्य आहे. त्याचबरोबर रेणुकादेवीचे मंदीर याच तालुक्यात राशीन येथे आहे येथे हलत्या दीपमाला प्रसिद्ध आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेकडून गोदावरी व दक्षिणेकडून भीमा या दोन मोठ्या नद्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतात. श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे. त्याचबरोबर पुणे ते नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून जातो.










  • मागे जाण्यासाठी येथे क्लिक करा




  •  
    Copyright © 2012. All Rights Reserved